'त्या' चिमुकलीच्या शरीरात धडधडू लागले 41 वर्षीय शेतकऱ्याचे हृदय!

अन्‌ 'त्या' पाचवर्षीय मुलीच्या शरीरात धडधडू लागले 41 वर्षीय शेतकऱ्याचे हृदय!
'त्या' चिमुकलीच्या शरीरात धडधडू लागले 41 वर्षीय शेतकऱ्याचे हृदय!
esakal
Summary

वैद्यकीय शास्त्राचे जग इतके अपडेट झाले आहे की त्याच्याशी संबंधित अनेक सुखद धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत.

वैद्यकीय शास्त्राचे (Medical science) जग इतके अपडेट झाले आहे की त्याच्याशी संबंधित अनेक सुखद धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात इंदूरमधील एका 41 वर्षीय शेतकऱ्याने मरणोत्तर केलेल्या अवयवदानातून (Organ donation) मिळालेले हृदय (Heart) पाच वर्षांच्या मुलीच्या शरीरात प्रत्यारोपित (Heart Transplant) करण्यात आले आणि ऑपरेशन यशस्वी झाले. हे ऑपरेशन होताच शेतकऱ्याचे हृदय मुलीच्या अंगात धडधडू लागले.

'त्या' चिमुकलीच्या शरीरात धडधडू लागले 41 वर्षीय शेतकऱ्याचे हृदय!
Omicron वर होत नाही लसींचा कोणताही परिणाम! लस निर्मात्यांची कबुली

वास्तविक, मुंबईतील एका रुग्णालयात दाखल असलेली पाच वर्षांची मुलगी हृदयविकाराच्या गंभीर आजाराशी झुंज देत होती. पीटीआयच्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका 41 वर्षीय शेतकऱ्याने मरणोत्तर अवयव दान केले होते. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर मुलीच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यासाठी अवयवदान केलेले हृदय मंगळवारी संध्याकाळी इंदूरहून मुंबईला विमानाने पाठवण्यात आले.

इंदूरच्या शासकीय महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. संजय दीक्षित यांनी सांगितले की, मुंबईतील एका रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल असलेली पाच वर्षांची मुलगी एका विकाराने त्रस्त होती, ज्यामध्ये तिचे हृदय आणि त्याच्या सभोवतालची जागा असामान्यपणे मोठी झाली होती. शेतकऱ्याच्या हृदयाचा आकार सामान्यापेक्षा लहान होता. अवयवांच्या या विचित्र संयोजनामुळे प्रौढ पुरुषाचे हृदय मुलीच्या शरीरात यशस्वीरीत्या प्रत्यारोपित केले गेले. सध्या हृदय प्रत्यारोपणानंतर मुलीची प्रकृती स्थिर असून मुंबईतील रुग्णालयातील डॉक्‍टर तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील पिपलिया गावातील शेतकरी सोलंकी हे 28 नोव्हेंबर रोजी एका रस्ता अपघातात गंभीर जखमी झाले होते आणि त्यांना इंदूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतरही सोलंकी यांची प्रकृती खालावली आणि डॉक्‍टरांनी मंगळवारी त्यांना ब्रेन डेड घोषित केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोलंकी यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असूनही त्यांनी त्यांच्या मृत कुटुंबातील सदस्याचे अवयव दान करण्यास सहमती दर्शवली.

'त्या' चिमुकलीच्या शरीरात धडधडू लागले 41 वर्षीय शेतकऱ्याचे हृदय!
'या' दोन रक्तगटांच्या लोकांना कोरोनाचा अधिक धोका!

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या हृदयासह यकृत, दोन्ही मूत्रपिंड आणि दोन्ही फुफ्फुसे काढण्यात आली. त्यानंतर यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड इंदूरमधील तीन गरजू रुग्णांना प्रत्यारोपित करण्यात आले, तर त्यांची दोन्ही फुफ्फुसे हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल असलेल्या 38 वर्षीय रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्याचे दोन्ही फुफ्फुसे मंगळवारी संध्याकाळी हैदराबादला एअरलिफ्ट करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com