Omicron वर होत नाही लसींचा कोणताही परिणाम! लस निर्मात्यांची कबुली

ओमिक्रॉनवर होत नाही लसींचा कोणताही परिणाम! कोविड लस निर्मात्यांची कबुली
Omicron वर होत नाही लसींचा कोणताही परिणाम! लस निर्मात्यांची कबुली
Omicron वर होत नाही लसींचा कोणताही परिणाम! लस निर्मात्यांची कबुलीesakal
Summary

कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकारातील स्पाइक प्रोटीनमध्ये इतर विषाणूंपेक्षा जास्त म्यूटेशन झाले आहे.

कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) प्रकारातील स्पाइक प्रोटीनमध्ये इतर विषाणूंपेक्षा जास्त म्यूटेशन झाले आहे, त्यामुळे त्यावर सध्या उपलब्ध लसी (Covid Vaccine) कमी प्रभावी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मॉडर्नाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बेन्सेल (Stephen Bensel) यांनी ही भीती व्यक्त केली आहे, की सध्या उपलब्ध कोरोना व्हायरस लस ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटशी सामना करण्यात कमी प्रभावी ठरू शकतात. स्टीफन बेन्सेल यांनी चेतावनी दिली आहे की, या नवीन व्हेरिएंटविरुद्ध प्रतिकारशक्ती (Immunity) प्रदान करू शकणारी लस विकसित करण्यासाठी फार्मास्युटिकल कंपन्यांना अनेक महिने लागू शकतात. बेन्सेल म्हणाले की, विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमध्ये मोठ्या प्रमाणात म्यूटेशन झाल्यामुळे, नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन सध्याची लस दिल्यानंतर तयार होणारे अँटीबॉडीपासून वाचण्यास सक्षम असू शकते.

Omicron वर होत नाही लसींचा कोणताही परिणाम! लस निर्मात्यांची कबुली
JIO चे रिचार्ज 700 रुपयांनी महाग! 'या' प्लॅन्समध्ये झाली वाढ

जगभरात ओमिक्रॉनची भीती

फायनान्शिअल टाईम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्टीफन बेन्सेल यांनी सांगितले की, मला वाटते, ही लस त्या स्तरावर प्रभावी ठरू शकत नाही, जी डेल्टाच्या विरोधात यशस्वी झाली होती. बेन्सेलने असेही सांगितले की, त्यांची कंपनी 2022 मध्ये 2 ते 3 अब्ज लसीचे डोस बनवू शकते. तथापि, त्याने संपूर्ण लसीचे उत्पादन ओमिक्रॉनच्या विरुद्ध चालू करणे धोकादायक देखील म्हटले आहे. ते म्हणाले की, कोरोनाचे इतर प्रकार अजूनही पसरत आहेत आणि ते धोकादायक असू शकतात.

मॉडर्नाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जे सांगितले त्या आधारावर असा अंदाज वर्तविला जात आहे की, कोरोना महामारी दीर्घकाळ खेचू शकते. इतकेच नाही तर हा नवीन व्हेरिएंट लोकांना अधिक आजारी आणि रुग्णालयात दाखल करण्याचे कारण बनू शकतो. Omicron पासून साथीचा रोग लांबण्याची भीती जगभरातील शेअर बाजारांवर दिसून येत आहे.

Omicron वर होत नाही लसींचा कोणताही परिणाम! लस निर्मात्यांची कबुली
'या' दोन रक्तगटांच्या लोकांना कोरोनाचा अधिक धोका!

जपानचा निक्केई इंडेक्‍स आणि बहुतेक युरोपियन आणि यूएस स्टॉक मार्केटमध्ये यामुळे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारातही कमालीची घसरण झाली आहे. ओमिक्रॉनच्या बातमीमुळे शुक्रवारीच जगभरातील शेअर बाजाराला सुमारे $2 ट्रिलियन भांडवलाचे नुकसान सहन करावे लागले. सोमवारी बाजार काहीसा सावरला, पण बेन्सेल यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यात कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे. तथापि, ओमिक्रॉनच्या सततच्या धोक्‍याच्या अहवालांदरम्यान, ब्रिटनच्या ऑक्‍सफर्ड ग्रुपचे संचालक, ऍस्ट्राझेनेका लसीचे निर्माते यांनी आशा व्यक्त केली आहे की, या नवीन व्हेरिएंटचा प्रभाव इतका होणार नाही की महामारी पुन्हा उद्भवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com