Diamond : कोहिनूरपेक्षा मोठा हिरा जो भारताच्या मंदिरातून चोरला होता, आज आहे न्यूयॉर्कच्या संग्रहालयात

जवळपास 787 कॅरेटचा हा हिरा भारतात सापडलेला सर्वात मोठा नैसर्गिक हिरा
Diamond
Diamondesakal

Diamond : आजवर तुम्ही फक्त कोहिनूर हिऱ्याविषयीच ऐकत आलाय. हा हिरा भारतातून ब्रिटनमध्ये पोहोचला आणि नंतर तो परत आणण्याची मागणी सातत्याने होत राहते. फार कमी लोकांना याची माहिती आहे की, भारताकडे आणखीन खूप सारे मौल्यवान हिरे होते. यात ऑर्लोव्ह नावाचा कोहिनूरपेक्षाही मोठा हिरा होता. तो जेव्हा खाणीतून बाहेर काढला तेव्हा तो कोहिनूरपेक्षा मोठा होता.

जवळपास 787 कॅरेटचा हा हिरा भारतात सापडलेला सर्वात मोठा नैसर्गिक हिरा मानला जातो. हा हिरा 1650 मध्ये गोवळकोंडा येथे सापडला होता. मात्र, पॉलिश केल्यावर तो केवळ 195 कॅरेट इतका कमी झाला. हा हिराही कोहिनूरसारखा शापित मानला जातो आणि त्यामागे एक अतिशय रंजक कथा आहे. 19 व्या शतकात पाँडिचेरीच्या एका मंदिरात ब्रह्मदेवाच्या मूर्तीच्या डोळ्यात हा मोठा हिरा होता असं म्हणतात. त्यावेळी भारत हा हिऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध होता. एक पुजारी तिथून जात असताना त्याला हा हिरा दिसला. पुजार्‍याने हिरा चोरण्याची योजना आखली आणि त्यात तो यशस्वीही झाला. पण असं म्हटलं जातं की हा हिरा ज्याच्याकडे गेला त्याच्यासाठी तो अपशकुन ठरला.

Diamond
Tech Tips : तुम्ही ब्राउझरवर पासवर्ड, Username ही सेव्ह करता का?  एका चुकीमुळे मोठा गंडा बसू शकतो

असं म्हणतात की ब्रह्माजींच्या मूर्तीतून तो गायब होताच तो शापित झाला आणि ज्यांच्याकडे तो गेला, ते सर्वजण कोणत्या ना कोणत्या कारणाने मरण पावले. त्यावेळी भारतातून अनेक हिरे चोरून इतर देशांमध्ये विकले जात होते. बराच काळ याबद्दल कोणतीही माहिती नव्हती. परंतु 1932 मध्ये हा हिरा न्यूयॉर्कच्या एका व्यापाऱ्याजवळ सापडला होता. त्याचं नाव जे डब्ल्यू पॅरिस होतं. काही काळानंतर त्याने हा हिरा विकला, पण त्याचा शाप त्याच्याकडेच राहिला. त्याच वर्षी व्यावसायिकाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं. रेकॉर्डनुसार, त्याच्या शापामुळे मरण पावलेला व्यापारी पहिला होता. त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितले की तो बराच काळ अस्वस्थ होता आणि त्याने स्वतःवरील नियंत्रण गमावले होते.

Diamond
Period Pain Relief Tips: पीरियड्सदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी ऋजुता दिवेकरनं सुचवले सोपे उपाय

दोन्ही राजकन्यांनी उडी मारून आत्महत्या केली

पॅरिस नावाच्या त्या व्यापाऱ्याने हा हिरा रशियाच्या राजघराण्याला विकला होता. आता तो दोन राजकन्या लिओनिला व्हिक्टोरोव्हना-बर्याटिन्स्की आणि नादिया विंगिन ऑर्लोव्ह यांच्याकडे आला. जेव्हा हा हिरा त्याच्यापर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी या हिऱ्याचं नाव ब्लॅक ऑर्लोव्ह ठेवलं. हिऱ्याच नाव बदललं असलं तरी त्याच्यासोबत असलेला शाप संपला नव्हता.

Diamond
Fashion Tips : जीन्स विकत घेताना या 4 गोष्टींची काळजी घ्या, मिळेल परफेक्ट फिगर अन् शेप

हिरा रशियाच्या राजघराण्यात पोहोचल्यापासून त्यांच्या अडचणी सुरू झाल्या. 1947 मध्ये एके दिवशी राजकुमारी लिओनिला अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यानंतर तिने उंचावरून उडी मारून स्वतःचा जीव दिला. असं म्हटलं जातं की एका महिन्यानंतर दुसऱ्या राजकुमारीलाही असंच वाटू लागलं. त्यावेळी ती रोममध्ये होती आणि खूप अस्वस्थ होती. तिने एका इमारतीत जाऊन तिथून उडी मारून आपले जीवन संपवलं. या हिऱ्याला एक शाप देण्यात आला होता की तो ज्याच्याकडे जातो तो कुठूनतरी उडी मारून जीव देतो.

Diamond
Huma Qureshi Beauty Tips: हुमा कुरेशीच्या निरोगी त्वचेचे रहस्य आले समोर, सकाळी उठून करते हे काम

शापित हिऱ्याची कथा पाश्चिमात्य देशांमध्ये पोहोचली

या तीन घटनांनंतर हा हिरा शापित असल्याची चर्चा पाश्चिमात्य देशांमध्ये रंगू लागली. यानंतर हा हिरा चार्ल्स एफ. विल्सन यांनी घेतला आणि तीन तुकड्यांमध्ये विभागला. असं केल्याने त्याचा शाप संपेल असं त्यांना वाटत होतं. चार्ल्सने मग त्याचे तुकडे नेकलेस आणि इतर दागिन्यांमध्ये ठेवले. सध्याचा हिरा आपल्याला माहीत आहे, पण उरलेल्या दोन हिऱ्यांचा ठावठिकाणा अजून एक गूढ आहे.

Diamond
Curd Benefits For Health साखर की मीठ? दही कशासोबत खाणे ठरेल फायदेशीर, जाणून घ्या

काही वर्षांनंतर डेनिस या हिऱ्याच्या व्यापाऱ्याने तो विकत घेतला, पण तो त्याच्याकडे आल्यापासून तो आजारी पडू लागला. भीतीपोटी त्याने अनेकवेळा तो हिरा दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. प्रत्येक वेळी हा हिरा कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याच्याकडे परत यायचा. मात्र 1947 नंतर असा कोणताही रेकॉर्ड सापडला नाही. हा व्यापारी देखील मरण पावला. हा हिरा आता न्यूयॉर्क म्युझियममध्ये ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येतं. पण तो हिरा भारतीय नाही आणि त्याला कोणताही शाप नाही असं अमेरिकन लोक मानतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com