esakal | Viral Video : जिल्हा रुग्णालयात गोंधळ; नर्सनं लगावली डॉक्टरच्या कानशिलात
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video : जिल्हा रुग्णालयात गोंधळ; नर्सनं लगावली डॉक्टरच्या कानशिलात

Viral Video : जिल्हा रुग्णालयात गोंधळ; नर्सनं लगावली डॉक्टरच्या कानशिलात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

दररोजच्या वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येमुळे देशात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यू तर होतच आहेत. यातच भर म्हणून दिवसरात्र काम करणारे डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफ अतिरिक्त कामामुळे तणावात आहेत. त्यांच्यातील तणाव स्पष्ट दिसत आहे. कामाच्या ठिकाणाचा तणाव त्यांच्या चेहऱ्यावर एकदम स्पष्टपणे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमधील एक धक्कादायक घटना घडली आहे. रामपूरमधील एका रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांच्यात वाद झाल्याचा प्रकार व्हिडिओत कैद झाला आहे.

रामपूर (Rampur) जिल्हा रुग्णालयात स्वाक्षरीवरुन नर्स आणि डॉक्टरमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. शाब्दिक चकमक सुरु असतानाच नर्सचं संतुलन बिघडलं अन् डॉक्टरांवर हातही उचलला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ

हेही वाचा: कोरोना पेशंटला घेऊन आरोग्य कर्मचारी गेले उसाचा रस प्यायला; VIDEO VIRAL

हेही वाचा: Viral Video : मुंगूस आहे की चित्रपटातला 'हिरो'? भल्याभल्यांना लाजवेल असा अभिनय!

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेनऊच्या आसपास रुग्णालयात हा प्रकार घडला. रामपूर जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. यावेळी फाईलवरील स्वाक्षरीवरुन नर्स आणि निवृत्त सीएमएस बीएम नागर यांच्यासोबत शाब्दिक चकमक झाली. यावेळी बोलता बोलता नर्सनं निवृत्त डॉक्टरावर हात उचलला. नागर निवृत्त झाल्यानंतरही कोरोना संकटात मदतीसाठी पुढे आले होते.

loading image