Punjab Election : बळीराजाला हवीय पंजाबची सत्ता, 22 संघटनांनी बांधली मोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer

Punjab Election : बळीराजाला हवीय सत्ता, 22 संघटनांनी बांधली मोट

चंदीगड : संयुक्त किसान मोर्चाशी संलग्न (Samyukta Kisan Morcha) असलेल्या 22 शेतकरी संघटनांनी 2022 ची पंजाब विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. (Punjab Assembly Election 2022 ) त्यानुसार या 22 शेतकरी संघटनांनी संयुक्त समाज मोर्चा या राजकीय पक्षाची स्थापना केली असून, बीएस राजेवाल (BS Rajewal) पंजाबमधील शेतकऱ्यांच्या राजकीय आघाडीचे नेतृत्व करणार आहेत. बीकेयू (डाकोंडा) आणि बीकेयू (लखोवाल) या तीन कृषी संस्था लवकरच पक्षात प्रवेश करायचा की नाही याचा निर्णय घेणार आहेत. दरम्यान या संघटनांकडून सर्व 117 जागांवर निवडणूक लढवली जाणार आहेत. (A new Samyukta Samaj Morcha formed Party In Punjab)

कोणत्याही शेतकरी संघटनेने किंवा पक्षाने निवडणुकीत त्यांचे नाव, पोस्टर किंवा इतर गोष्टींचा वापर करू नये, असेही संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे. ही महत्त्वाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत किसान संघ आम आदमी पक्षासोबत युती करण्याची मागणी करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. (Panjab Assembly Election 2022)

हेही वाचा: "मोदी सरकारपेक्षा महाराजा हरि सिंह यांची हुकुमशाही चांगली होती"

32 पैकी 22 शेतकरी संघटना निवडणुकीच्या रणधुमाळीत

या 22 शेतकरी संघटना, ज्यांनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे, त्या पंजाबमधील 32 शेतकरी संघटनांपैकी आहेत ज्यांनी तीन केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात एक वर्षाहून अधिक काळ आंदोलनात भाग घेतला होता. शेतकरी नेते हरमीत सिंग कडियान म्हणाले की, पंजाबमध्ये पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणूका लढवण्यासाठी संयुक्त समाज मोर्चाची स्थापना करण्यात आली आहे. (Punjab Farmers Association)

दुसरीकडे, शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या अनेक शेतकरी संघटनांनी संयुक्त किसान मोर्चा (SKM) संघटनेचा भाग असलेल्या निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कीर्ती किसान संघ, क्रांतीकारी किसान संघ, बीकेयू-क्रांतीकारी, दोआबा संघर्ष समिती, बीकेयू-सिद्धुपूर, किसान संघर्ष समिती आणि जय किसान आंदोलन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या विरोधात आहेत.

Web Title: A New Samyukta Samaj Morcha Is Formed For Contesting Punjab Assembly Elections

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Farmers Agitation
go to top