"मोदी सरकारपेक्षा महाराजा हरि सिंह यांची हुकुमशाही चांगली होती"

जम्मू-काश्मीर राज्यातील द्विवार्षिक 'दरबार मूव्ह' बंद
Modi_Hari Singh
Modi_Hari Singh

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) केंद्रशासित झाल्यानं इथं आता केंद्राची सत्ता आहे, पण इथल्या कारभारावरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad) यांनी मोदी सरकारवर (Modi Govt) निशाणा साधला आहे. सध्याच्या सरकारपेक्षा महाराजा हरि सिंह यांची हुकुमशाही चांगली होती, अशा शब्दांत त्यांनी मोदींना टार्गेट केलं आहे.

Modi_Hari Singh
राज्यातील लॉकडाऊनबाबत आरोग्य मंत्र्यांचे महत्त्वाचे विधान

केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना आझाद यांनी जम्मू आणि काश्मीर प्रशासनावरही टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले, "राज्यात मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांची भरवली जाणारी द्विवार्षिक 'दरबार मूव्ह' ही पारंपरा प्रशासनानं बंद केली आहे. या परंपरेला १४९ वर्षांचा इतिहास असून महाराजा गुलाब सिंह यांनी १८७२ मध्ये ही परंपरा सुरु केली होती. त्यानुसार जम्मू-काश्मीरमध्ये सहा-सहा महिन्यांसाठी दोन राजधान्या निश्चित करण्यात आल्या होत्या. यामध्ये उन्हाळ्यात सहा महिने श्रीनगर तर उर्वरित सहा महिन्यांसाठी जम्मू शहराकडे राज्याच्या राजधानीची जबाबदारी असायची. जून २०२० मध्ये नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ही पद्धत बंद केली."

Modi_Hari Singh
लुधियाना स्फोटाचं खलिस्तानी कनेक्शन; पंजाबच्या DGPची माहिती

आझाद म्हणाले, "आम्ही कायम दरबार मूव्हला पाठिंबा दिला. काश्मीरवर सत्ता गाजवलेल्या इतिहासातील लोकांनी जम्मू आणि काश्मीर या दोन्ही भागातील जनतेसाठी तीन गोष्टी दिल्या ज्या लोकहितार्थ होत्या. यांपैकीच एक दरबार मूव्ह ही होती. जे मूळचे जम्मू-काश्मीरचे नाहीत त्यांच्यासाठी राजा हरि सिंह यांनी जमीन आणि नोकऱ्यांना संरक्षण दिलं होतं. त्यामुळं महाराजा हरि सिंह जे स्वतःला हुकुमशहा समजत होते पण त्यांचं शासन हे सध्याच्या शासनापेक्षा चांगलं होतं. त्यांनी जम्मू आणि काश्मीरला एकच मानलं होतं कधीही यापैकी कुठल्या एका भागाची त्यांनी बाजू घेतली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com