
Niyamatpur Village
sakal
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील सिधौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नियामतपूर या गावाने एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. या गावात गेली ३७ वर्षे पोलिसांत एकही तक्रार (FIR) दाखल झालेली नाही. या गावच्या लोकांचे प्रेम आणि भाईचारा इतका आहे की, आसपासच्या जिल्ह्यांतही त्याची चर्चा होते आणि गावकरी त्यांचे उदाहरण देतात.