Viral Video: माजी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला शिवीगाळ, नंतर केला किळसवाणा प्रकार... व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणाला अटक

Akhilesh Yadav: यानंतरही या तरुणाने समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव, तसेच संपूर्ण यादव समाजाबद्दल अपमानास्पद आणि अपमानजनक भाषा वापरली.
Man Urinates On Akhilesh Yadav Poster
Man Urinates On Akhilesh Yadav PosterEsakal

Man Urinates On Akhilesh Yadav Poster:

वाराणसीतील एका तरुणाचा एका घृणास्पद व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या पोस्टरव लघुशंका करताना दिसत आहे.

दरम्यान हे कृत्य करताना तरुणाने फेसबुक लाइव्ह दरम्यान स्वतः या व्हिडिओ चित्रण केले आहे. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला तत्काळ अटक करण्यात आली आहे.

या प्रकारानंतर समाजवादी पक्षाच्या (SP) कार्यकर्त्यांनी आरोपी तरुणाविरुद्ध चोलापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

या प्रकरणातील आरोपीचे नाव बडेलाल चौहान असे आहे. फेसबुक लाइव्हव दरम्यान अखिलेश यादव यांच्या पोस्टरवर त्याने लघुशंका केली. तसेचत्यांच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरली.

यानंतरही या तरुणाचा राग शांत झाला नाही, तेव्हा त्याने समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव, तसेच संपूर्ण यादव समाजाबद्दल अपमानास्पद आणि अपमानजनक भाषा वापरली.

या तरुणांवर कारवाई न झाल्यास या घटनेच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशार समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतले.

Man Urinates On Akhilesh Yadav Poster
Rahul Gandhi : जाहीरनामा नव्हे ‘जुमला पत्र’; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भाजपच्या संकल्प पत्रावर टीका

चोलापूर पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपीला तत्काळ अटक करून कायद्याच्या कलमांखाली कारागृहात पाठवण्यात आले.

"चोलापूर पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे, संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे," असे पोलीस उपायुक्त वरुणा झोन यांनी सांगितले.

Man Urinates On Akhilesh Yadav Poster
Lok Sabha Survey: मोदी सोडून PM म्हणून कोणाला पसंती? तमिळनाडूत भाजपला भोपळा? सी वोटरचा सर्व्हे आला समोर

दरम्यान देशात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. यासाठी सात टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशातही सात टप्प्यात मतदान होणार आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार आहे. तर शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com