आशुतोष मसगौंडे

नमस्कार, मी आशुतोष मसगौंडे. सध्या ई-सकाळमध्ये मल्टिमीडिया प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. देश-विदेश, अर्थ, क्रीडा आणि न्यायालयाच्या संबंधातील बातम्यांमध्ये माझा हातखंडा आहे. तसेच सध्याच्या फेक न्यूजच्या जमान्यात फॅक्ट चेक करत वाचकांना खरी माहिती देण्यास माझे प्राधान्य असते. शैक्षणिक पार्श्वभूमी मी बीए इंग्रजीमध्ये पदवी घेतली असून, पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. तसेच प्रसिद्ध आयएलएस लॉ कॉलेजमधून एलएलबी चे शिक्षण पूर्ण केले आहे. मीडिया क्षेत्रातील अनुभव मी 2017 पासून मीडिया क्षेत्रात काम करत आहे. या दरम्यान काही वर्षे वृत्तपत्रांमध्येही काम केले आहे. आता डिजिटल मीडियात काम करताना इथल्या वाचकांना डोळ्यासमोर ठेऊन विविध विषय त्यांच्यासमोर रंजकपणे मांडण्यावर माझा भर असतो. तसेच प्रत्येक विषयात खोलात जाऊन वाचकाला संबंधीत विषयाची संपूर्ण माहिती देण्यावर माझा भर असतो.
Connect:
आशुतोष मसगौंडे
आणखी वाचा