काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Young man voted eight times: ईव्हीएमबाबत विरोधकांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत.
 man voted eight times
man voted eight times
Updated on

नवी दिल्ली- ईव्हीएमबाबत विरोधकांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेसकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओमध्ये एकच तरुण आठवेळा मतदान करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

अखिलेश यादव यांनी व्हिडिओ शेअर करत निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हिडिओमध्ये दावा करण्यात आलाय की, एकच व्यक्ती आठवेळा वेगवेगळ्या मतदान केंद्रावर गेला अन् त्याने आठवेळा मतदान केलं. पोस्टमध्ये अखिलेश यादव म्हणालेत की, 'निवडणूक आयोगाला हे चुकीचं वाटत असेल तर ते कारवाई करतील. नाही तर...! भाजपची बूथ कमेटी ही लूट कमेटी आहे.'

 man voted eight times
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून पैशांचा पाऊस... आतापर्यंत 9 हजार कोटींची रोकड जप्त! गुजरात पहिल्या नंबरवर

राहुल गांधी यांनी अखिलेश यादव यांची पोस्ट रिट्विट केली आहे. यात ते म्हणालेत की, 'आपला पराभव दिसत असल्याने भाजप सरकारी यंत्रणांवर दबाव टाकून लोकशाहीला लुटू पाहात आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी सत्तेच्या दबावाला बळी न पडता संवैधानिक जबाबदारीचं भान ठेवेल अशी अपेक्षा काँग्रेस करतं. नाहीतर इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर संविधानाच्या शपथेचा अपमान करणाऱ्यावर अशी कारवाई केली जाईल की तो पुन्हा दहा वेळा विचार करेल.'

 man voted eight times
Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

अखिलेश यांनी १७ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला असला तरी सोशल मीडियावर पूर्ण व्हिडिओ व्हायरल होत आहे. पूर्ण व्हिडिओ २ मिनिट १९ सेकंदाचा आहे. व्हिडिओत दिसतंय की, एक तरुण वेगवेगळ्या मतदान केंद्रावर जाऊन आठवेळा मतदान करतो. मतदान केल्यानंतर तो कितीवेळा मतदान केलं हे देखील सांगतो. आपण कोणाच्या नावाने मतदान टाकायला जातोय हे देखील तरुण व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे.

दरम्यान, व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी सकाळ माध्यम समूह करत नाही. व्हिडिओ कधीचा आहे, कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.