

SummitSathi' device to prove a boon in remote villages of Himachal.
Sakal
विज्ञानाची योग्य सांगड जर समाजोपयोगी कामासाठी घातली तर केवढी मोठी क्रांती घडू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण हैदराबादमधील एका १२ वीच्या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे. हिमालयातील अतिदुर्गम भागात जेव्हा मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी किंवा दरडी कोसळल्यामुळे इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्कचे टॉवर्स ठप्प होतात, तेव्हा अशा संकटकाळात स्थानिक नागरिकांना हवामानाची आगाऊ माहिती मिळावी यासाठी या विद्यार्थ्याने 'समिटसाथी' (SummitSathi) नावाचे अनोखे सॅटेलाईट यंत्र विकसित केले आहे.