Ajit Pawar Plane Crash : ब्लॅक बॉक्सचं नुकसान, फ्लाइट डेटा रेकॉर्डर खराब; AAIBचा २२ पानी अहवाल, दुर्घटनेआधी एकच संदेश आला

AAIB Report on Ajit Pawar Plane Crash अजित पवार यांच्या विमानाला महिनाभरापूर्वी झालेल्या अपघाताचा २२ पानी प्राथमिक अहवाल जाहीर करण्यात आला आहे.लँडिंगवेळी पाच किलोमीटर परिसरातील दृश्यमानता खूप कमी होती असं अहवालात म्हटलं आहे.
AAIB Releases 22 Page Report On Ajit Pawar Plane Crash

AAIB Releases 22 Page Report On Ajit Pawar Plane Crash

Esakal

Updated on

AAIB Publishes Preliminary Report On Ajit Pawar Plane Crash राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला महिनाभरापूर्वी झालेल्या अपघाताचा २२ पानी प्राथमिक अहवाल 'एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरोने (एएआयबी) शनिवारी जाहीर केला. या अहवालात कमी दृश्यमानता आणि धावपट्टीवर आवश्यक दिशादर्शक (नेव्हिगेशन) सुविधांचा अभाव अपघातास कारणीभूत असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. अजित पवार यांना घेऊन येणारे विमान उतरविले जात असताना पाच किलोमीटर परिसरातील दृश्यमानता खूप कमी होती, असेही त्यात म्हटले आहे. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com