esakal | कोझिकोड विमान अपघातामागची कारणे काय? चौकशी अहवाल आला समोर
sakal

बोलून बातमी शोधा

kozhikode plane crash

कोझिकोड विमान अपघातामागची कारणे काय? चौकशी अहवाल आला समोर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : गेल्या वर्षी केरळमधील कोझिकोड विमानतळावर विमानाचा (kozhikode plane crash) मोठा अपघात झाला होता. हा अपघातामागची कारणे मात्र समजू शकली नव्हती. आता विमान अपघात का झाला? याचा शोध एअरक्राफ्ट अपघात अन्वेषण ब्युरोने घेतला. AAIB ने चौकशी अहवाल सादर केला. कमी दृश्यमानता आणि विंडशिल्ड वाइपर व्यवस्थित काम करत नसल्यामुळे वैमानिकाला पुढील अडथळा दिसू शकला नाही. वैमानिकाला अंतराचा अंदाज आला नाही. त्यामुळेच कोझिकोड विमान दुर्घटना झाली असावी असे या अहवालामध्ये सांगितले आहे.

हेही वाचा: केरळ विमान दुर्घटना : पायलट कॅप्टन दीपक साठे यांच्यासह 14 जणांचा मृत्यू

वैमानिकाला मानक संचालक प्रणालीचे पालन करणे गरजेचे होते. मात्र, ते न केल्यामुळे हा अपघात झाला असावा. पण, याचवेळी सहाय्यक प्रणालीचे अपयश देखील दुर्लक्षित करून चालणार नाही. प्रणालीमध्ये बिघाड झाला होता. पहिल्यांदा विमान लँड करताना कॅप्टनच्या बाजूला असलेले वाईपर काम करत नव्हते. त्यानंतर दुसऱ्यांदा लँड करताना वाईपर काम करत होते. पण, त्याचा वेग खूपच कमी होता. एसओपीनुसार, पहिल्यांदा चूक होत असेल तर वैमानिकाला दुसऱ्या पर्यायी पद्धतीचा वापर करणे अनिवार्य आहे. यामध्येच हाच घटक महत्वाचा होता. एसओपी मध्ये दिल्याप्रमाणे पहिल्या अधिकाऱ्यांनी नियंत्रण ताब्यात घेऊन चूक लक्षात घेणे गरजेचे होते. तीच योग्य प्रक्रिया होती. मात्र, स्टीप ऑथॉरिटी ग्रेंडीयंटने पहिल्या अधिकाऱ्याला सहभागी होण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे विमान धावपट्टीवर थांबू शकले नाही, असेही या अहवालामध्ये म्हटले आहे.

एआयएक्समध्ये त्रूटी -

एआयएक्सएलमध्ये बाल/अर्भक संयम प्रणालीची तरतूद नसल्याचे चौकशी अहवालात सांगण्यात आले आहे. विमानातील 10 लहान मुलांपैकी तीन जण गंभीर जखमी झाले, तीन गंभीर जखमी झाले आणि चार जण बचावले. अभ्यासानुसार, कुठलाही प्रवासी हा विमानामध्ये लहान बाळांना मांडीवर घेऊन बसू शकत नाही. तसे केल्यास अपघातावेळी त्यांना अधिक धोका होण्याची शक्यता असते. तसेच एका अब्यासानुसार, हवाईप्रवासादरम्यान बालकांना मांडीवर घेऊन बसणे सुरक्षित नाही. पण, याठिकाणी अनेक प्रवासी हे बालकांना मांडीवर घेऊन बसले होते. त्यामुळे बालके गंभीर जखमी झाली होती.

कोझिकोड दुर्घटना -

गेल्या ७ ऑगस्ट २०२० ला एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइट IX 1344 हे दुबईहून केरळच्या कोझिकोड या ठिकाणी आलं होतं. हे विमान धावपट्टीवर एका दरीत कोसळलं होतं. यामध्ये १२३ जण जखमी झाले होते, तर जवळपास २० जणांचा मृत्यू झाला होता.

loading image
go to top