esakal | केरळ विमान दुर्घटना : पायलट कॅप्टन दीपक साठे यांच्यासह 14 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

captain deepak sathe

भारतीय हवाई दलातील माजी निवृत्त अधिकारी आणि एअर इंडियाचे पायलट कॅप्टन दिपक वसंत साठे यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

केरळ विमान दुर्घटना : पायलट कॅप्टन दीपक साठे यांच्यासह 14 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोझिकोड - केरळ (kerala) विमान दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच मृतांचा आकडा वाढण्याची भीती असून 15 जण गंभीर तर 123 जण जखमी झाले आहेत. भारतीय हवाई दलातील माजी निवृत्त अधिकारी आणि एअर इंडियाचे (Air India) पायलट कॅप्टन दिपक वसंत साठे (deepak Sathe) यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. दुबईतून केरळला आलेल्या एअर इंडियाचे विमान क्रॅश झाले. केरळमधील कोझिकोड (Kozikode) इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँडिंगवेळी ही दुर्घटना घडली.  या विमानातून 191 जण प्रवास करत होते. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

कॅप्टन दीपक वसंत साठे हे हवाई दलातील माजी अधिकारी होते. 1981 पासून 2003 पर्यंत त्यांनी 22 वर्षे हवाई दलात सेवा बजावली होती. निवृत्त झाल्यानंतर ते व्यावसायिक विमान उड्डाण करायचे. भारतीय हवाई दलातील पायलट होते. तसंच बोइंग 737 सारख्या विमान उड्डाणांचा त्यांना अनुभव होता. 

विमान दुर्घटनेनंतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहे. अग्निशामक दल आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळावर पोहोचल्या असून बचाव कार्य सुरू आहे. IX1344 या विमानाने दुबईतून सायंकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी उड्डाण केलं होतं. विमानात एकूण 191 प्रवासी होते. यामध्ये 174 जण वयस्क होते तर 10 नवजात बालकांसह दोन पायलट आणि पाच क्रू मेंबर्सचा समावेश होता. दुर्घटनेत जखमी झालेल्यांनी रुग्णालयात नेलं जात आहे. 

हे वाचा - केरळमधील एअर इंडिया विमानाच्या दुर्घटनेचे पाहा व्हिडिओ

कोझीकोड आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीसीजे) येथे झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि अग्निशमन दलाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बचाव आणि वैद्यकीय सहाय्य यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
- पी. विजयन, मुख्यमंत्री

loading image
go to top