
दिल्लीत आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या १५ नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. माजी सभागृह नेते मुकेश गोयल यांनी एक नवीन पक्ष स्थापन करण्याचा दावा केला आहे. ज्याला त्यांनी इंद्रप्रस्थ विकास पार्टी असे नाव दिले आहे. त्यांनी दावा केला आहे की, १३ नगरसेवक त्यांच्यासोबत सामील झाले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवकही आमच्यात सामील होऊ शकतात.