दृष्टीहीन झैनब बिलालशी आमीरच्या दिलखुलास गप्पा

श्रीनगरमधील ‘रेडिओ डीपीएस’वर मुलाखत
aamir
aamirsakal
Updated on

श्रीनगर : दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस) येथील ‘लर्निंग रिसोर्स सेंटर’मधील (एलआरसी) १२ वर्षांच्या झैनब बिलाल या विद्यार्थिनीने एक अनोखी कामगिरी केली आहे. तिने प्रसिद्ध अभिनेता आमीर खान याची मुलाखत घेतली. सेलिब्रिटीची मुलाखत घेणारी ती देशातील पहिली दृष्टिहीन मुलगी ठरली आहे. (National News)

शाळेतर्फे चालविण्यात येणाऱ्या ‘रेडिओ डीपीएस’ला ही मुलाखत आमीर खानने दिली. ‘डिपीएस’संचलित रेडिओवरून सहावीत शिकत असलेल्या झैनबला मंगळवारी मुलाखत देत छान गप्पा मारल्या.

aamir
पुणे-नाशिक हायस्पिड रेल्वेला शेतकऱ्यांचा विरोध

यावेळी आमीरने टेनिसची आवड, लडाख व काश्‍मीरमधील चित्रीकरणादरम्यान आलेल्या अनुभवासह अनेक मुद्यांवर सविस्तर माहिती दिली. दृष्टीबाधित लोकांवर चित्रपट तयार करण्याची इच्छा झैनबने त्याच्याकडे व्यक्त केली. ‘‘माझा आवडता अभिनेता आमीर खान याची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. अशा प्रकारे माझे स्वप्न पूर्ण होईल, असे मला कधीही वाटले नव्हते’’ असे झैनब म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com