esakal | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ सक्रिय; केजरीवालांच्या दौऱ्याला सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

delhi election 2020 aam aadmi party arvind kejriwal win confirm afternoon trends

Punjab: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ सक्रिय; केजरीवालांच्या दौऱ्याला सुरुवात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : पंजाबमध्ये काँग्रेसमधील राजकीय वादानंतर आता आप आदमी पक्ष अधिक सक्रिय झाला आहे. पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल पंजाब दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत आप निवडणूक रिंगणात असेल.
पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ सुरू आहे. या सर्व घटनांचे परिणाम आगामी निवडणुकीत दिसून येतील. काँग्रेसमधील वादाचा फायदा करून घेण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांची पंजाब भेट महत्त्वाची मानली जाते. या भेटीदरम्यान केजरीवाल युवकांच्या रोजगाराचा आराखडा जाहीर करणार आहेत. तसेच उद्योजक आणि व्यावसायिकांबरोबर करतील.

हेही वाचा: शहांची भेट कशासाठी? अमरिंदर सिंगांनी केला खुलासा; म्हणाले, "अमित शहा..."

बेरोजगारीच्या मुद्याला हात
अरविंद केजरीवाल यांनी बेरोजगारांना भत्ता हा त्यांच्या निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला आहे. उत्तराखंडमध्ये सत्तेत आल्यास तरुणांना सहा महिन्यांच्या आत एक लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. नोकरी मिळत नाही, तोपर्यंत प्रत्येक बेरोजगारांना दरमहा पाच हजार रुपये भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच गोव्यात सत्तेवर आल्यावर त्यांनी बेरोजगारांना दरमहा तीन हजार रुपये बेरोजगारी भत्ता देण्याची घोषणा केली आहे. सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर आपनेही त्यांच्यावर टीका केली आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी सिद्धू यांना दलित विरोधी म्हटले आहे. पंजाबमधील काँग्रेसचे नेते राजकुमार वर्का यांनीही केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीत केजरीवाल यांनी केवळ पाच टक्के लोकांना मोफत वीज दिली असून त्यांनी जनतेची फसवणूक केली असल्याची टीका त्यांनी केली आहे.

loading image
go to top