केजरीवाल यांचा शपथविधी सोहळा 16 फेब्रुवारीला; पण...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

व्हिडिओच्या माध्यमातून केजरीवाल म्हणाले...

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत विजय मिळवला आहे. त्यांचा शपथविधी सोहळा येत्या 16 फेब्रुवारीला होणार आहे. मात्र, त्यांच्या या शपथविधीला इतर कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री किंवा राजकीय नेते आमंत्रित केले जाणार नाही, अशी माहिती आपचे नेते गोपाळ राय यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केजरीवाल सरकारच्या या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीतील सामान्य जनतेला खास आमंत्रित करण्यात येणार असून, त्यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होणार आहे. त्यांच्या या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री किंवा इतर राजकीय नेत्यांना आमंत्रित केले जाणार नाही. याबाबतची माहिती गोपाळ राय यांनी दिली. ते म्हणाले, 'तुमचा मुलगा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहे. तुमच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी जरूर या', असे आवाहन व्हिडिओ पोस्ट करून केले आहे.

राज्यसभेत यावर्षी किती कामकाज झाले

व्हिडिओच्या माध्यमातून केजरीवाल म्हणाले...

जेव्हा भारतमातेच्या प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळेल. भारताच्या प्रत्येक नागरिकाला चांगले उपचार मिळतील. सुरक्षा व सन्मान महिलांमध्ये आत्मसन्मान निर्माण करेल. युवकांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांनी त्यांच्या घामाचे मूल्य मिळेल. प्रत्येक भारतीयाला मुलभूत सुविधा मिळतील. धर्म, जात सोडून प्रत्येक भारतवासी भारताला पुढे घेऊन जाईल, तेव्हाच 'अमर तिरंगा आकाशात अभिमानाने फडकेल'.

शपथविधी सोहळा सर्वांसाठी खुला

सर्वसामान्यांच्या उपस्थितीत रामलीला मैदानावर मोठ्या संख्येने हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दिल्लीतील जनतेने आपला विजय मिळवून दिला. हा सोहळा सर्वांसाठी खुला राहणार असल्याची माहिती गोपळ राय यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AAP invites Little Mufflerman to Arvind Kejriwals oath taking ceremony