'नवं गुजरात मॉडेल'; मोदींच्या राज्यात केजरीवाल लढवणार सर्व जागा

Arvind Kejriwal
Arvind KejriwalFile photo

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अहमदाबाद दौऱ्यावर आहेत. याठिकाणी त्यांनी आज आम आदमी पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन केलं. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी अरविंद केजरीवाल राज्यात पक्षाचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. केजरीवाल यांनी पत्रकारांना संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. गुजरातमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे 182 जागांवर आपचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. (AAP leader and Delhi CM Arvind Kejriwal contest on all seats in the 2022 Gujarat Legislative Assembly Polls)

गुजरातमध्ये 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. केजरीवाल यांनी गुजरातच्या एका नव्या मॉडेलचे आश्वासन दिले आहे. दिल्ली मॉडेल वेगळे आहे आणि गुजरातचे मॉडेल वेगळे असेल असं ते म्हणाले आहेत. आप गुजरातच्या लोकांच्या मुद्द्यांवरुन राजकारण करेल. केजरीवाल म्हणाले की, '2022 मध्ये लोकांच्या प्रश्वांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाईल आणि स्थानिक नेताच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल.' आज अहमदाबादमध्ये माजी पत्रकार इसुदान गढवी यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. गढवी शेतकऱ्यांच्या प्रश्वावर लढणारे नेते म्हणून ओळखले जातात.

Arvind Kejriwal
'अनेक मुद्द्यांवर दोघांचे एकमत'; संभाजीराजेंची प्रतिक्रिया

गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये एकाच पार्टीचे सरकार आहे. ही काँग्रेस आणि भाजपच्या दोस्तीची गोष्ट आहे. काँग्रेस भाजपच्या खिशात आहे. भाजपला आवश्यकता असते तेव्हा काँग्रेस त्यांना सप्लाय करते. गुजरातमध्ये बदल आवश्यक आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत आप सर्व जागांवर निवडणूक लढवेल, असं मी आश्वासन देतो, असं केजरीवाल म्हणाले. गुजरातच्या लोकांना वाटतं दिल्लीत वीज मोफत असेल तर इथं का नाही? गेल्या 70 वर्षात हॉस्पिटलची परिस्थिती बदलेली नाही, असंही ते म्हणाले.

Arvind Kejriwal
चे गवेराची 'आरोग्य क्रांती'

गुजरातमध्ये 2022 मध्ये शेवटच्या महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. 182 सदस्यांच्या विधानसभेवर भाजपचा गेल्या 20 वर्षांपासून ताबा आहे. काँग्रेस आणि भाजपचे राजकारण पाहिलेल्या गुजरातमध्ये आप पक्ष आपले हातपाय पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. फेब्रुवारी महिन्यातही अरविंद केजरीवाल यांनी सुरतमध्ये रोड शो केला होता. स्थानिक निवडणुकीमध्ये आपने चांगली कामगिरी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com