esakal | 'अनेक मुद्द्यांवर दोघांचे एकमत'; संभाजीराजेंची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

sambhaji raje

'अनेक मुद्द्यांवर दोघांचे एकमत'; संभाजीराजेंची प्रतिक्रिया

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

पुणे- उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज अर्धा तास चर्चा झाली. त्यांच्या भेटीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. चर्चेनंतर संभाजीराजे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, अनेक मुद्द्यांवर दोघांचं एकमत झालं आहे. बऱ्याच वर्षांनी उदयराजेंची भेट झाली. तशी आमची भेट होत राहतेच. पण दोन घराण्यांची एका मुद्द्यावरुन भेट झाली, आम्ही एकत्र आलो. उदयनराजेंसोबत भेट झाल्याचा मला मनापासून आनंद आहे. (sambhaji raje meet udyanraje bhosle in pune maratha reservation issue)

मराठा आरक्षण प्रकरणी आज दोन पर्याय आहेत. एक, रिव्हू्व्ह याचिका करणे. रिव्हू्व्ह याचिका टिकली नाही, तर क्युरेटिव्ह याचिका दाखल करावी लागेल. पण, भोसले समितीनुसार क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची गरज नाही. त्यामुळे 338-b च्या माध्यमातून वेगळा आयोग तयार करावा लागले. त्यानंतर हा विषय राज्यपालांकडे जाईल. त्या ठिकाणी मागासवर्ग सिद्ध करावे लागेल. त्यानंतर राज्यपाल राष्ट्रपतींकडे हा विषय पाठवतील. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर 342-a च्या माध्यमातून ते केंद्रीय मागासवर्गाकडे हा विषय पाठवतील. त्यानंतर केंद्रीय मागासवर्ग राज्य मागासवर्गाकडून सगळा डेटा मिळवेल. त्यानंतर राष्ट्रपतींना वाटल्यास हा विषय संसदेत घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे सर्व राजकर्त्यांनी ठरवायचंय की कोणता पर्याय घ्यायचाय आणि कोणत्या पद्धतीने पुढे जायचंय, असं संभाजीराजे म्हणाले.

हेही वाचा: आमचे विचार एकच; उदयनराजेंचा संभाजी राजेंच्या आंदोलनाला पाठिंबा

आम्ही पाच मागण्या केल्यात. त्या पूर्ण करणे राज्याच्या हातात आहेत. त्यातील पहिली मागणी सार्थीची, दुसरी मागणी अण्णासाहेब पाटील महामंडळाची आहे. तिसरी मागणी, ओबीसींना ज्या सवलती मिळतात त्या मराठा समाजाला द्या. चौथी मागणी पंजाबराव देशमुख योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात एक वसतीगृह निर्माण करा. पाचवी महत्त्वाची मागणी जे 2 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी अडकले आहेत त्यांना नोकरी द्या. सुप्रीम कोर्टानेही आदेश दिला आहे. या मागण्या मंजूर करा आम्ही तुमचं स्वागत करु. पण आता आम्ही खूप बोललोय, आता लोकप्रतिनिधींनी बोलण्याची वेळ आली आहे. अधिवेशनाची आमची मागणी आहे. या माध्यमातून काही प्रश्न सुट शकतात, असंही ते म्हणाले.

loading image