
नवी दिल्ली : अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप झालेले आम आदमी पक्षाचे (आप) उत्तम नगर मतदारसंघाचे आमदार नरेश बाल्यान यांची राऊज अव्हेन्यू न्यायालयाने दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. तीन तासांच्या चौकशीनंतर शनिवारी रात्री पोलिसांनी त्यांना अटक केली होती.