esakal | Delhi Election : दिल्लीत मिळणार आता 'या' सुविधा; आपकडून गॅरंटी कार्ड
sakal

बोलून बातमी शोधा

AAP to release Kejriwals Guarantee Card on Sunday
 • मुख्य जाहीरनाम्यापूर्वी केजरीवालांकडून गॅरंटी कार्ड जारी
 • विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवास, महिलांसाठी मार्शल

Delhi Election : दिल्लीत मिळणार आता 'या' सुविधा; आपकडून गॅरंटी कार्ड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 :
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये आता राजकीय हवा चांगलीच तापू लागली असून मुख्य निवडणूक जाहीरनाम्यापूर्वी आम आदमी पक्षाने आज दहा आश्‍वासनांचा समावेश असलेले गॅरंटी कार्ड प्रसिद्ध केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवास, महिलांच्या सुरक्षेसाठी मोहल्ला मार्शलची नियुक्ती आदी बाबींचा समावेश आहे. आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर ही आश्‍वासने पूर्ण करू असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या गॅरंटी कार्डला केजरीवालांच्या दहा हमी असे नाव देण्यात आले असून यामध्ये मोफत वीज पुरवठा आणि आरोग्य सेवा, यमुनानदीची स्वच्छता आणि पुढील पाच वर्षांमध्ये दिल्लीतील प्रदूषण घटविणे आदी लक्ष्ये निर्धारित करण्यात आली आहे. यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले की, "दिल्लीतील जनतेला मी दहा गोष्टींची हमी देतो आहे, हा काही आमचा जाहीरनामा नाही. आम्ही आमचा सर्वसमावेशक जाहीरनामा पुढील सात ते दहा दिवसांमध्ये प्रसिद्ध करू, आमच्या जाहीरनाम्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक अशा सर्वच घटकांसाठी तरतुदी असतील. तो सर्वांसाठी असेल.''

CAAला कोणतेच राज्य नकार देऊ शकत नाही; कारण...-कपिल सिब्बल

विरोधकांच्या टीकेचा समाचार घेताना केजरीवाल म्हणाले की, आमच्या योजना या केवळ 31 मार्चपर्यंतच टिकतील अशी टीका करत आहेत, याचाच अर्थ असा पुढील पाच वर्षे त्या कायम राहतील. आम्ही प्रत्येक घरी चोवीस तास वीज देऊ यातील दोनशे युनिट हे मोफत असतील.

केजरीवालांची हमी

 • पाच वर्षांपर्यंत 200 युनिट वीज मोफत
 • प्रत्येक घरामध्ये चोवीस तास शुद्ध पाणी
 • पदवीपर्यंत दर्जेदार शिक्षण
 • लोकांना मोफत आणि प्रभावी उपचार
 • पाचशे किमीपेक्षा जास्त मेट्रो नेटवर्कची उभारणी
 • दिल्लीत 1.5 लाख सीसीटीव्हीींपेक्षा अधिक पथदिव बसविणार
 • दिल्लीत दोन कोटी झाडे लावणार, यमुनेची सफाई
 • हिला सुरक्षेसाठी मोहल्ल्यात मार्शलची तैनाती
 • झोपडपट्टीवासियांना पक्की घरे बांधून देणार
 • सार्वजनिक वाहतुकीसाठी अकरा हजार नव्या बस