CM Arvind KejriwalSakal
देश
CM Arvind Kejriwal : महिला सन्मान योजने’ची चाैकशी करण्याचे आदेश
Women Honor Scheme : दिल्लीतील ‘मुख्यमंत्री महिला सन्मान योजना’ची चौकशी करण्याचे आदेश नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी मुख्य सचिव व पोलिस आयुक्तांना दिले आहेत.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री महिला सन्मान योजने’ची चौकशी करण्याचे आदेश आज नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी लिहिलेल्या पत्रांद्वारे दिल्लीचे मुख्य सचिव आणि पोलिस आयुक्तांना दिले.