esakal | कोरोनावर भारतीय औषध! AAYUDH Advance ठरतंय प्रभावी; ट्रायल यशस्वी
sakal

बोलून बातमी शोधा

Aayudh

कोरोनावर भारतीय औषध! AAYUDH Advance ठरतंय प्रभावी; ट्रायल यशस्वी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अहमदाबाद - जगभरात कोरोनाने थैमान घातलं असून अनेक देशांना कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेचा फटका बसत आहे. सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणही जगभरात सुरु आहे. मात्र तरीही कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचं दिसत नाही. भारतात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोनाचे नवीन रुग्ण विक्रमी संख्येनं आढळत आहेत. अशा परिस्थितीत आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. AAYUDH Advance या औषधाची ट्रायल अहमदाबादच्या दोन सरकारी रुग्णालयात घेण्यात आली. यामध्ये आयुध हे औषध कोरोनावर प्रभावी ठरलं आहे. ट्रायलवेळी असं आढळून आलं की, फक्त चारच दिवसात आयुध अॅडव्हान्स घेणाऱ्या रुग्णांमधील कोरोनाचा संस्रग वेगाने कमी झाला.

AAYUDH Advance औषधाची ट्रायल घेतल्यानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाले नसल्याचाही दावा करण्यात आला आहे. ज्या कोरोना रुग्णांवर AAYUDH Advance चा उपचार करण्यात आला ते सर्व कोरोनामुक्त झाले. तसंच ताप, खोकला, श्वास घेण्यासाठी त्रास होणं यांसारखी कोरोनाची लक्षणेही कमी झाली. कंटेम्पररी क्लिनिकल ट्रायल कम्युनिकेशन या मासिकात याबाबत संशोधन प्रसिद्ध जाले आहे. त्यानुसार AAYUDH हे औषध कोरोनाच्या उपचारात अॅडव्हान्स स्टँडर्स ऑफ केअरच्या चाचणीत प्रभावी ठरलं आहे. हे संशोधन नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, अमेरिका यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालं आहे.

हेही वाचा: प्रचार रणधुमाळीत ममता दीदींनी घेतला मोठा निर्णय

आयुधची पहिली मानवी चाचणी ऑक्टोबर 2020 मध्ये एनएचएल नगर मेडिकल कॉलेज आणि SVPIMSR, एलिसब्रिज, अहमदाबादमध्ये कऱण्यात आली होती. तर दुसरी चाचणी जानेवारी 2021 मध्ये GMERS मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, सोला, अहमदाबादमध्ये करण्यात आली होती. पहिल्या संशोधनावेळी सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांवर याची चाचणी घेतल्यानंतर ती यशस्वी ठरली होती. पहिल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये यश मिळाल्यानंतर मोठी ट्रायल करण्यात आली. यानंतर अधिक लक्षणे असलेल्या रुग्णांवर आणि ज्यांना कोणताही गंभीर आजार नाही त्यांच्यावर चाचणी घेतली गेली. या रुग्णांना दिवसात चार वेळा आयुधचे डोस देण्यात आले. चारच दिवसात हे रुग्ण कोरोनामुक्त झाले.

हेही वाचा: 'मोदी पंतप्रधान नव्हे पक्षपाती प्रचारक'

ट्रान्सलेशशन हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट आणि भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या रेमडेसिव्हिरच्या तुलनेत आयुध तीन पटीने प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. गुजरातमध्ये तयार झालेलं आयुध अॅडव्हान्स हे एक लिक्विड आहे. ज्यामध्ये २१ प्रकारच्या वनस्पतींचा अर्क आहे. आयुर्वेदिक शास्त्रात यातील वनस्पतींचा वापर हा मानवासाठी प्रभावी आणि सुरक्षित असल्याचा उल्लेख आहे. याचा वापर 50 हजारांहून अधिक लोकांकडून केला जात आहे.