दाऊदचा साथीदार कुट्टीला झारखंडमधून अटक;तब्बल २४ वर्षांनी गुजरात पोलिसांना यश 

वृत्तसंस्था
Monday, 28 December 2020

‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुट्टी हा केरळचा रहिवासी आहे. तो १९९६ मध्ये १०६ पिस्तुले, ७५० काडतुसे आणि जवळपास चार किलो आरडीएक्स गोळा करण्याच्या गुन्ह्यात सहभागी होता.

जमशेदपूर, (झारखंड) - फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार, अब्दुल माजीद कुट्टी याला गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (‘एटीएस’) आज येथून अटक केली. माजीद हा सुमारे २४ वर्षांपासून फरार होता. 

‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुट्टी हा केरळचा रहिवासी आहे. तो १९९६ मध्ये १०६ पिस्तुले, ७५० काडतुसे आणि जवळपास चार किलो आरडीएक्स गोळा करण्याच्या गुन्ह्यात सहभागी होता. या गुन्ह्यात त्याच्या इतर साथीदारांना अटक झाली होती. मात्र कुट्टी फरार होता. तो झारखंडमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुजरात पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘एटीएस’च्या अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘राज्य गुप्तचर विभागाकडून कुट्टीच्या ठावठिकाण्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शोधासाठी ‘एटीएस’चे पथक झारखंडला रवाना केले होते.’’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गुजरात आणि महाराष्ट्रात १९९७च्या प्रजासत्ताक दिली स्फोट घडवून आणण्याची दाऊद इब्राहिमची योजना होती. त्यासाठीच त्याने मोठ्या प्रमाणात ‘आरडीएक्स’ गोळा केले होते. मात्र त्याचा तो डाव उधळला गेला होता व त्यावेळी त्याच्या इतर साथीदारांना अटक करण्यात आली होती, अशी माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

कुट्टीचा आधी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे आणि नंतर त्याची चौकशी करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abdul Majeed Kutty arrested from Jharkhand Success for Gujarat Police after 24 years