नजरकैदेत असताना अब्दुल्ला-मेहबुबा यांच्यात झाली बाचाबाची कारण...

वृत्तसंस्था
Monday, 12 August 2019

जम्मू-काश्मीरमध्ये एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्यात भाजप व 370 हटविण्यावरून चांगलीच बाचाबाची झाली. 

श्रीनगर ः जम्मू-काश्मीरमध्ये एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्यात भाजप व 370 हटविण्यावरून चांगलीच बाचाबाची झाली. 

दरम्यान, भाजप सरकारकडून कलम ३७० हटवल्यानंतर गेल्या आठवड्यात या दोन्ही नेत्यांना हरि निवास महल येथे नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यादरम्यान भाजपाला जम्मू-काश्मिरात कोणी आणलं? यावरून दोघांमध्ये वादाला ठिणगी पडली, दोघांतील वाद एवढा विकोपाला गेला की अब्दुल्ला यांना तेथून अन्यत्र हलवण्यात आले.

दरम्यान, काश्मीरमध्ये भाजपला कोणी आणलं? या मुद्द्यावरून अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली. दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू असताना फारूख अब्दुल्ला महबूबा मुफ्तीवर चांगलेच भडकले. 2015 आणि 2018 मध्ये भाजपाशी हातमिळवणी केल्यावरून अब्दुल्ला यांनी मुफ्तींचे दिवगंत पिता मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यावर टीका केली. आता अब्दुल्ला यांना तेथून अन्यत्र हलविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abdullaha and mehbooba mufti separted in detention after a spat with each other