दिल्लीत सहकाऱ्यांना पुन्हा ताब्यात घेतलं, दीपके कच्च्या रस्त्याने पोहोचले शेतात; आंदोलनाबाबत फोनवरून चर्चा

Abhijeet Dipke on Delhi Protest: दिल्लीत जंतर मंतर परिसरात घुसण्याचा प्रयत्न करताना सीजेपीच्या आशुतोष रांका, अजिंक्य शिंदे यांच्यासह इतरांना ताब्यात घेण्यात आलंय. यावर आता अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया दिलीय.
Abhijeet Dipke

Abhijeet Dipke on Delhi Protest

Esakal

Updated on: 

Abhijeet Dipke: दिल्लीत सीजेपीचे आशुतोष रांका, अजिक्यं शिंदे यांच्यासह इतर सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर संस्थापक अभिजीत दीपके हे हिंगोलीतील त्यांच्या गावात आजीच्या अंत्यसंस्कारासाठी आले आहेत. दिल्लीत पुन्हा सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कुंडकर पिंपरी शिवारात एका शेतात पोहोचल्यानंतर ते कच्च्या रस्त्याने जंगलात गेले. इनोव्हा कारमधून जंगल परिसरात पोहोचून त्यांनी आंदोलनाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com