बॅनर्जींमुळे विद्यार्थ्याला ग्रीन कार्ड मिळते तेव्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

नोबेल विजेते भारतीय अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांची कर्तृत्वगाथा आता जगभर चर्चेचा विषय ठरली आहे. बॅनर्जी हे संशोधक म्हणून जितके मोठे आहेत, तितकेच एक माणूस म्हणूनदेखील त्यांचे मोठेपणे ठळकपणे उठून दिसणारे आहे.

पणजी - नोबेल विजेते भारतीय अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांची कर्तृत्वगाथा आता जगभर चर्चेचा विषय ठरली आहे. बॅनर्जी हे संशोधक म्हणून जितके मोठे आहेत, तितकेच एक माणूस म्हणूनदेखील त्यांचे मोठेपणे ठळकपणे उठून दिसणारे आहे. 

बॅनर्जी यांनी कोलकत्यातील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले होते. याच शिक्षण संस्थेतील एका माजी विद्यार्थ्याला अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळत नव्हते, अमेरिकेच्या प्रशासनाने तब्बल दशकभरापासून हे कार्ड रोखून धरले होते; पण बॅनर्जी यांच्या एका पत्रामुळे या विद्यार्थ्याला हे कार्ड मिळू शकले.

प्रेसिडेन्सी कॉलेजच्या माजी विद्यार्थी आणि मुंबईतील वरिष्ठ बॅंकर रुनिया सेन म्हणाल्या की,‘‘माझ्या मित्राला अमेरिकेत राहायला जायचे होते. त्याने २००५मध्ये अर्ज केला; पण मित्राच्या तीन वर्षांच्या पदवीचे कारण देत हा अर्ज नाकारण्यात आला. अमेरिकेतील पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा असतो. यामुळे मित्राला नैराश्‍य आले होते. शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या प्रेसिडन्सी कॉलेजच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना ई-मेल केला, यामध्ये नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांचाही समावेश होता. यापैकी फक्त बॅनर्जी यांनी त्याच्या पत्राला उत्तर दिले त्यासाठी त्यांनी ‘मॅसाच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजी’ या संस्थेच्या लेटरहेडचा वापर केला होता. पुढे या लेटरहेडच्या आधारेच त्याला ग्रीन कार्ड मिळू शकले.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhijit banerjee student green card