Abhijit Deepke Supports INDIA Alliance Rally :
esakal
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (SIR) प्रक्रिया रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली INDIA आघाडीतील सर्व पक्ष १ नोव्हेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानावर महारॅली काढणार आहेत. या रॅलीला आता कॉकरोच जनता पार्टीनेही पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.