Abhijit Dipke Released After 24 Hours
esakal
कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संयोजक अभिजीत दीपके यांची दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाली आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. कनॉट प्लेस येथे ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन करण्याचं आवाहन केल्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतलं होतं. जामीन मिळाल्यानंतर दीपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तुरुंगातील २४ तासांचा अनुभव सांगितला आहे.