

Abhinandan Varthaman Joins FLY91 as Commercial Pilot
esakal
Abhinandan Varthaman Joins FLY91 as Commercial Pilot : भारतीय हवाई दलाचे माजी ग्रुप कॅप्टन आणि ‘वीर चक्र’ विजेते अभिनंदन वर्धमान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. २०१९ मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या हवाई संघर्षादरम्यान पाकिस्तानचे F-16 लढाऊ विमान पाडल्यानंतर ते देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, तीन दिवसांनी त्यांची भारतात सुखरूप परतफेड करण्यात आली. आता भारतीय हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर अभिनंदन यांनी आपल्या कारकिर्दीतील नवा अध्याय सुरू केला आहे.