
नवी दिल्ली : आॅपरेशन सिंदूर बाबत वस्तुस्थिती सांगण्यासाठी केंद्राच्या वतीने विदेशात पाठविण्यात येणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि लोकसभेचे खासदार अभिषेक बॅनर्जी हे सहभागी होणार असल्याची घोषणा पक्षाच्यावतीने मंगळवारी करण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी चर्चा केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे समजते.