
उत्तर प्रदेशातील कौशांबी इथं शनिवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. वरातीतून परतणाऱ्यांची कार झाडाला धडकून झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये हवाई दलातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रद्धांजली वाहिली असून शोक व्यक्त केलाय.