Hit and Run: हिट अँड रनची भीषण घटना! इलेक्ट्रिक बसने ६ जणांना चिरडले; जखमींची प्रकृती गंभीर
Hit and Run Case: हिट अँड रनची भीषण घटना समोर आली आहे. इलेक्ट्रिक बसने ६ जणांना चिरडले आहे. यात ६ जणांचीही प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
गाझियाबाद जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. मसुरी पोलीस स्टेशन परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मसुरी बस स्टँडजवळ एका मेट्रो इलेक्ट्रिक बसने सहा लोकांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात पाहून घटनास्थळी गोंधळ उडाला आहे.