
घराबाहेर उभी महिलेसह चार मुलांना कारने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना समोरील एका घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या अपघातात महिलेच्या डोक्याला दुखापत झाली, तर चारही मुले गंभीर जखमी झाली असून जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजस्थानच्या कोटा शहरता हा काळजाचा थरकाप उडविणारा अपघात घडला.