मुलीवर बलात्कार केला म्हणून पोलिसांनी 'त्याला' ठाण्यात नेलं, ती निघाली महिलाच; वैद्यकीय अहवालानं पितळ उघडं

पोलिसांनी महिलेला अल्पवयीन मुलीला फूस लावल्याप्रकरणी दोषी ठरवलंय.
Rajasthan Crime News
Rajasthan Crime Newsesakal
Summary

पोलिसांनी महिलेला अल्पवयीन मुलीला फूस लावल्याप्रकरणी दोषी ठरवलंय.

राजस्थानमधील सिरोहीतून (Rajasthan Sirohi) एक धक्कादायक घटना समोर आलीय. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी (Police) पकडून ठाण्यात नेलं. पोलिसांच्या चौकशीत आरोपी हा मुलगा नसून मुलगी असल्याचं स्पष्ट झालं.

'आरोपी मुलगी असल्यामुळं ती बलात्कार करू शकत नाही'. पोलिसांनी आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र, आरोपीच्या वारंवार सांगण्यावरून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

Rajasthan Crime News
Nitin Gadkari : 2024 पर्यंत भारत 'या' गोष्टीत अमेरिकेच्या बरोबरीनं असेल; नितीन गडकरींचा मोठा दावा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 28 नोव्हेंबरला एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर महिला पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेडा येथील रहिवासी शंकर (25 वय) यानं माझं अपहरण केलं आणि दोन दिवस माझ्यावर बलात्कार केला, असं पीडित मुलीनं सांगितलं. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. मात्र, मेडा गावात शंकर नावाचा तरुण सापडला नाही. यावर पोलिसांनी पुन्हा पीडितेला आरोपीच्या चारित्र्याबाबत विचारणा केली. त्याआधारे पोलिसांनी 5 डिसेंबरला आरोपी तरुणाला पकडून पोलिस ठाण्यात आणलं.

Rajasthan Crime News
DY Chandrachud : आमच्यासाठी कोणतीही गोष्ट लहान-मोठी नसते; सरन्यायाधीशांचा कायदा मंत्र्यांना टोला

पोलिस चौकशीत आरोपी शंकरनं सांगितलं की, मी मुलीला घेऊन गेला होता; पण तिच्यावर बलात्कार केला नाही. मी मुलगी असल्यामुळं तिच्यावर बलात्कार करू शकत नव्हतो. पोलिसांचा आरोपीच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता, पण मुलगा त्याच्या बोलण्यावर ठाम होता. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीचं मेडिकल करून घेतलं. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तपासात आरोपी मुलगा नसून महिला असल्याचं समोर आलं आहे. या महिलेनं 3 वर्षांपूर्वी मुलाला जन्म दिला आहे. आता त्यांची मुलगी तीन वर्षांची आहे.

Rajasthan Crime News
Sarhali Police : पोलिस स्टेशनवर झालेल्या हल्ल्यामागं विदेशी दहशतवाद्यांचा हात; DGP कडून मोठा खुलासा

वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करणाऱ्या मुलीची आणि तिच्या कुटुंबीयांची चौकशी केली. त्यानंतर मुलीनं आपण खोटा आरोप केल्याचं मान्य केलं. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचं मेडिकल केलं होतं, त्याचा अहवाल येणं बाकी आहे. तर, दुसरीकडं वैद्यकीय तपासणीत आरोपी महिला असल्याचं वास्तव समोर आल्यानंतर पोलिसांना बलात्काराचा गुन्हा खोटा असल्याचं निष्पन्न झालं. मात्र, पोलिसांनी महिलेला अल्पवयीन मुलीला फूस लावल्याप्रकरणी दोषी ठरवलं. त्यानंतर पोलिसांनी महिलेला न्यायालयात हजर केलं, तेथून तिची कारागृहात रवानगी करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com