खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप; त्रिपुरात दोन पत्रकारांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Journalist

खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप; त्रिपुरात दोन पत्रकारांना अटक

sakal_logo
By
सुधीर काकडे

त्रिपुरामध्ये दोन महिला पत्रकारांविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. तर पोलिसांनी धमकावल्याचा आरोप या या महिला पत्रकारांनी केला आहे. पत्रकार समृद्धी सकुनिया आणि स्वर्णा झा यांनी आरोप केला आहे की, पोलिसांनी त्यांच्या हॉटेलमध्ये येऊन त्यांना धमकावले. सायंकाळी उशिरा त्यांना ताब्यात घेण्यात आलं. या पत्रकारांवर दोन धार्मिक गटांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विहिंप नेत्या कांचन दास यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी समृद्धी सकुनिया आणि स्वर्ण झा या दोन्ही महिला पत्रकारांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. खोट्या बातम्या प्रकाशित करून जातीय सलोखा बिघडवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं त्रिपुराचे पोलिस महानिरीक्षक अरिंदम नाथ यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: स्वातंत्र्यसैनिक आजी कंगनावर संतापल्या; PM मोदींना केलं आवाहन

त्रिपुरातील एका मशिदीची नासधूस आणि तोडफोड केल्याच्या सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या बातम्या खोट्या आणि चुकीच्या पद्धतीने मांडल्या गेल्याचं गृहविभागाने सांगितल्याचं एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तामधून समोर आलं आहे.

loading image
go to top