"स्वातंत्र्य भीक?"; संतापलेल्या स्वातंत्र्यसैनिक आजींचं PM मोदींना आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kangna ranaut

स्वातंत्र्यसैनिक आजी कंगनावर संतापल्या; PM मोदींना केलं आवाहन

sakal_logo
By
सुधीर काकडे

आपल्या अभिनयापेक्षा वादग्रस्त विधानांमुळे (kangna ranaut's Controversial Statement) चर्चेत असलेली बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावतणे केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. देशाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या या धक्कादायक विधानावर आता वेगवेळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत असतानाच एका आजीबाईंचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

९१ वर्षीय लीलाताई चितळे स्वातंत्र्यसैनिक आजींनी अभिनेत्रीला चांगलंच सुनावल्याचं पाहायला मिळतंय. "मी टीव्हीवर बघीतलं कंगना राणावत नावाच्या एक बाई म्हणाल्या, देशाला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं आहे. त्या बाईंना आताच राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे, त्यांचं ते विधान ऐकल्यावर मी अत्यंत अस्वस्थ झाले आणि संतापले. कारण मी वयाच्या बाराव्या वर्षी तुरुंगात गेले होते. बापुजींना सांगितलं होतं, इंग्रजी शिक्षणावर बहीष्कार घाला, त्यावेळी आम्ही तीन मैत्रीणी कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना इंग्रजीवर बहीष्कार टाकण्यासाठी बाहेर काढलं. त्यावेळी आम्हाला एक दिवसभर पोलीस चौकीत बसावं लागलं. माझे वडील आणि भाऊ जेलमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे जेव्हा ही बाई म्हणते स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं, तेव्हा मला संताप आला. मी या बाईचा निषेध करते" असंही त्या पुढे म्हणाल्या.

हेही वाचा: कंगनाच्या वादग्रस्त विधानावर खासदार अमोल कोल्हे म्हणतात...

पुढे त्या असंही म्हणाल्या की, "या बाईला समज देण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी करावं, तिला समज देऊन देशाला जाहीरपणे सांगावं की आम्ही तिला समज दिला आहे. अशा बोलण्याला देशद्रोह म्हणतात हे पंतप्रधानांनी देशाला सांगितलं पाहिजे."

तरूण पीढीला जर वाटत असेल की देशाला स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळालं, तर या देशाचं भविष्य काय असेल? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. निशस्त्र लढाई लढून आपल्या देशाने स्वातंत्र्य मिळवलं हे कुणीही विसरू शकत नाही. जगात ज्या ब्रिटीश सरकारचा सुर्य माळवत नव्हता त्या ब्रिटीशांना आपल्या देशाने झुकवलं, हा अद्वितीय प्रयोग होता असंही त्या म्हणाल्या. कंगना राणावत यांनी केलेल्या त्या विधानामुळे आपल्याला वेदना झाल्या, हे विधान मी पचवू शकले नाही असंही त्या पुढे म्हणाल्या.

loading image
go to top