बलात्काराची तक्रार मागे घेण्यास नकार; पीडितेवर ऍसिड हल्ला

वृत्तसंस्था
रविवार, 8 डिसेंबर 2019

- ऍसिड हल्ल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल

- पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास

मुझफ्फरनगर : हैदराबाद बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे एक धक्कादायक घटना घडली. बलात्काराची तक्रार मागे न घेतल्याने पीडित महिलेवर ऍसिड हल्ला करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप 

उन्नाव बलात्कार प्रकरणापूर्वी ही घटना घडली. त्यानंतर आता शाहपूर येथे एका 30 वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्काराची तक्रार मागे घेण्यास संबंधित आरोपींकडून दबाव टाकला जात होता. मात्र, पीडित महिलेने त्यास नकार दिला होता. त्यानंतर संतप्त झालेल्या आरोपीने पीडित महिलेवर ऍसिड केला. या हल्ल्यात पीडित महिला 30 टक्के भाजली असून, तिच्यावर मेरठ रुग्णालयात पुढील उपचार सुरु आहेत.

त्रिपुरात हैदराबादची पुनरावृत्ती; सामूहिक अत्याचार करून मुलीला जिवंत जाळले

याबाबत शाहपूरचे (ग्रामीण) पोलिस अधीक्षक नेपाळसिंग यांनी सांगितले, की महिलेवर केलेल्या ऍसिड हल्ल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही याचा सर्व बाजूंनी तपास करत आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Acid thrown at rape victim for refusing to withdraw case in Muzaffarnagar