त्रिपुरात हैदराबादची पुनरावृत्ती; सामूहिक अत्याचार करून मुलीला जिवंत जाळले

वृत्तसंस्था
Sunday, 8 December 2019

सोशल मीडियावरून ओळख

शांतीरबझार (त्रिपुरा) : हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. त्यानंतर आता त्रिपुरातही अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या प्रियकर आणि त्याच्या मित्राने अपहरण करून सामूहिक अत्याचार केले. त्यानंतर पीडित मुलीला जाळले. ही घटना दक्षिण त्रिपुरातील शांतीरबजारमध्ये घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप 

पीडित मुलीच्या प्रियकराने तिला मागील दोन महिन्यांपासून खंडणीसाठी बंदीस्त करून ठेवले होते. जेव्हा पीडित मुलीचा मृत्यू झाल्याचे समजले तेव्हा रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी झाली आणि त्यांनी आरोपी आणि त्याच्या आईवर हल्ला केला, असे संबंधित तपास अधिकाऱ्याने सांगितले.

तसेच पीडित मुलीच्या कुटुंबियांनी आरोप केला, की अजॉय नावाच्या व्यक्तीने मुलीला सोडण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, मुलीचे कुटुंबीय शुक्रवारपर्यंत 17 हजार रुपयेच जमा करू शकले. त्यामुळे अजॉयने मुलीला पेटवून दिले. 

आईच्या दुधाची बँक; कोणाला होणार फायदा?, कोठे सुरू होणार बँक?

याबाबत दक्षिणी त्रिपुराचे पोलिस अधीक्षक जलसिंह मीणा यांनी सांगितले, की या प्रकरणातील मुख्य आरोपी अजॉयला रुग्णालायातून अटक केली आणि त्याला शांतीरबजार पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सध्या पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

सोशल मीडियावरून ओळख

पीडित मुलगी आणि आरोपी मुलाची सोशल मीडियावर ओळख झाली होती. दिवाळीनंतर ती त्यासोबत पळून गेली. जेव्हा तिने लग्नासाठी त्याच्याकडे विचारणा केली, तेव्हा त्याने तिच्या कुटुंबियांकडे पैशांची मागणी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 years old gang raped in Tripura and burned alive