esakal | उपद्रवी प्रवाशांवर कारवाईचा बडगा
sakal

बोलून बातमी शोधा

Aeroplane

विमानात प्रवाशांनी योग्य प्रकारे मास्क वापरले नाही अथवा कोविड नियमावलीचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. वारंवार सांगूनही एखाद्या प्रवाशाने नियमावलीचे उल्लंघन केल्यास अशा व्यक्तीला उपद्रवी प्रवासी ठरवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिला आहे.

उपद्रवी प्रवाशांवर कारवाईचा बडगा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - विमानात प्रवाशांनी योग्य प्रकारे मास्क वापरले नाही अथवा कोविड नियमावलीचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. वारंवार सांगूनही एखाद्या प्रवाशाने नियमावलीचे उल्लंघन केल्यास अशा व्यक्तीला उपद्रवी प्रवासी ठरवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिला आहे. या अनुषंगाने आज नवे दिशा निर्देश जारी करण्यात आले.

कोरोना संक्रमण वाढत असताना विमान प्रवासादरम्यान कोरोना नियमावलीचे प्रवाशांकडून उल्लंघन होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा कारवाईचा बडगा उगारला आहे. विमान वाहतूक मंत्रालयाच्या आदेशानुसार विमानात प्रवाशांना मास्क वापरणे, कोरोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असेल. तसे न केल्यास अशा प्रवाशांना विमानातून खाली उतरविले जाईल. याबाबतचे इशारे देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि प्रवाशांना उपद्रवी प्रवासी ठरवून त्यांना सुरक्षा यंत्रणांकडे सोपविण्यात येईल. वेळप्रसंगी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल. या आदेशांची विमान कंपन्यांनी त्याप्रमाणे सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ अंमलबजावणी करावी तसेच मास्क नसलेल्या कोणत्याही प्रवाशाला विमानतळाच्या परिसरात सीआयएसएफ आणि सुरक्षा यंत्रणांनी मज्जाव करावा, असे आदेशही देण्यात आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चिंता वाढली
देशात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे सरकारची चिंता वाढली आहे. विशेषतः महाराष्ट्र, पंजाब, केरळ, गुजरात, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये वाढत्या संसर्गाने केंद्र सरकारची झोप उडवली आहे. शुक्रवारपर्यंत २४ हजार ८८२  जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले असून देशभरात कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या २ लाखांच्या पुढे गेली आहे. यावर्षी चौथ्यांदा दिवसात २०,००० पेक्षा जास्त कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी होईल कारवाई 

  • विमानात मास्क  वापरणे बंधनकारक असेल
  • मास्क नसल्यास विमानातून खाली उतरविले जाणार
  • सुरक्षित अंतराकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना नो फ्लाय लिस्ट मध्ये टाकणार
  • उपद्रवी प्रवाशांवर किमान तीन महिने ते कमाल दोन वर्षांपर्यंत प्रवासबंदी
  • वारंवार सांगूनही दुर्लक्ष करणारे प्रवासी उपद्रवी प्रवासी मानले जातील

Edited By - Prashant Patil