मिथुन यांचा भाजपसाठी प्रचार; आसनसोलच्या अग्नीमित्रांना मते देण्याचे आवाहन

आसनसोल लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अग्नीमित्रा पॉल यांना मते देण्याचे आवाहन
Actor Mithun Chakraborty Campaign for vote Agnimitra BJP
Actor Mithun Chakraborty Campaign for vote Agnimitra BJPsakal

कोलकाता : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपसाठी प्रचार सुरु केला आहे. आसनसोल लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अग्नीमित्रा पॉल यांना मते देण्याचे आवाहन त्यांनी केले.भाजपचे दोन वेळचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी गेल्या वर्षी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ही जागा रिक्त झाली. सुप्रियो बालीगंजमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक लढवीत आहेत. राज्य मंत्री सुब्रत मुखर्जी यांच्या निधनामुळे ती जागा रिक्त झाली.

मिथुन म्हणाले की, अग्नीमित्रा या नामवंत डिझायनर आहेत. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली आहे. त्या जनतेला लुटणार नाहीत. त्यांना विकासाठी काम करायचे आहे.मतदारांनी भीती न बाळगता बाहेर पडून मतदान करावे असे आवाहनही त्यांनी केले. हा पोटनिवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. अग्नीमित्रा यांच्यासमोर तृणमूल काँग्रेसच्या शत्रुघ्न सिन्हा यांचे आवाहन असेल. शत्रुघ्न सिन्हा हे मिथुन यांचे समकालीन आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते पूर्वी भाजपमध्ये होते.या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी १२ एप्रिल रोजी मतदान होईल. निकाल १६ तारखेला जाहीर करण्यात येईल.

स्टार प्रचारक अन्् वाद

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी मिथुन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेला ते उपस्थित होते. प्रचारादरम्यान मिथुन यांची काही वक्तव्ये वादग्रस्त ठरली होती. मी पक्का कोब्रा असून एकदा दंश करताच तुम्ही छायाचित्रात जाऊन बसाल, असे ते म्हणाले होते. त्या निवडणुकीनंतर मिथुन राजकीय क्षेत्रात पुन्हा सक्रिय झाले आहेत.

तक्रार अन् आरोप

या निवडणुकीवरून भाजप आणि तृणमूल पुन्हा आमनेसामने आले आहेत. आम्हाला बुक्के मारण्यात आले तर आम्ही प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य अग्नीमित्रा यांनी केल्याचा आरोप तृणमूलकडून करण्यात आला. त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. कथित व्हिडिओनुसार त्या म्हणतात की, कुणी आम्हाला मारले तर आम्ही हात जोडून नमस्कार करणार नाही. आम्ही त्या व्यक्तीला आलिंगन देणार नाही. हल्लेखोराला प्रतिठोसा लगावणे हेच आमचे प्रत्यूत्तर असेल.

दरम्यान, आयोगाने याबद्दल अग्नीमित्रा यांना एक दिवस प्रचारास मनाई केली. त्याआधी तृणमूलचे आमदार नरेंद्रनाथ चक्रवर्ती यांच्या वक्तव्यावरून वाद झाला. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना भीती दाखवा, जेणेकरून ते मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर जाऊ शकणार नाहीत, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com