West Bengal: अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा भाजप प्रवेश, लागल्या 'जय श्री राम'च्या घोषणा

Actor Mithun Chakraborty joins Bharatiya Janata Party
Actor Mithun Chakraborty joins Bharatiya Janata Party

कोलकाता- अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी रविवारी भाजप प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पश्चिम बंगालमध्ये सभा होणार आहे. मिथुन चक्रवर्ती यावेळी त्यांच्या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी दिली होती. त्यामुळे मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करतीय कशी अटकळ बांधली जात होती. अखेर त्यांनी कमळ हाती घेतले आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.  पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या तारखा जवळ आल्याने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयार केली आहे. आज बंगालमध्ये 'सुपर संडे' पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. ते रविवारी कोलकाताच्या ब्रिगेट परेड मैदानात एका सभेला संबोधित करणार आहेत.

भाजप नेता विजयवर्गीय म्हणाले होते की, कोलकातामधील पंतप्रधान मोदींच्या रॅलीदरम्यान बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती उपस्थित राहतील. विजयवर्गीय म्हणाले की, मिथुन चक्रवर्ती यांच्या भाजप प्रवेशाविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. असे असले तरी मिथुन चक्रवर्ती यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगू लागली होती. अनुमानाप्रमाणे त्यांनी भाजप प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालमध्ये 27 मार्चपासून आठ टप्प्यात मतदान होईल, ज्याचा निकाल 2 मे रोजी लागेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com