मोहन भागवतांच्या वक्तव्याला सोनम कपूर म्हणाली 'फुलिश'

टीम ई-सकाळ
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

मोहन भागवत यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून, मोठा वाद निर्माण झाला.

मुंबई : अधून-मधून वादग्रस्त ट्विट किंवा कमेंट करून कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री सोनम कपूर आता पुन्हा एकदा वादात सापडली आहे. सोनम कपूरने थेट सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. ट्विटच्या माध्यमातून तिनं मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे. यामुळं सोनम कपूरला ट्विटरवर लक्ष्य केलं जातंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय म्हणाले होते मोहन भागवत?
मोहन भागवत यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून, मोठा वाद निर्माण झाला. मोहन भागवत म्हणाले होते की, घटस्फोटाच्या घटनांमध्ये सर्वाधिक घटना शिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये होतात. कारण शिक्षण आणि संपन्नतेमुळं एक प्रकारचा उद्धटपणा येतो. त्यामुळं अशी कुटुंब विभक्त होतात. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर  उलट-सुलट प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. यात आता अभिनेत्री सोनम कपूरनं उडी घेतलीय. 

आणखी वाचा - फिल्मफेअर सोहळ्यात असं काही घडलं की, गीतका म्हणाला 'अलविदा'

काय म्हणाली सोनम कपूर?
सोनम कपूरने एका इंग्लिश वर्तमानपत्राच्या वेबसाईटवरची बातमी शेअर करताना मोहन भागवत यांच्यावर टीका केलीय. सोनमनं म्हटलंय की, 'कोणता विवेकी माणूस असे बोलतो? प्रतिगामी मूर्ख विधान.' सोनमच्या या ट्विटवरून आता नेटिझन्सच्या प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. मोहन भागवत यांचे लग्न झालेले नाही. त्यामुळं त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया एका ट्विटर यूजरनं दिलीय. शिक्षण आपल्याला स्वातंत्र्य देतं. त्यामुळं शिकलेले लोक जर, त्यांच्या वैवाहिक जीवनात प्रेम नसेल तर, बाजुला होतात, असं शेफाली मिश्रा हिनं म्हटलंय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress sonam kapoor tweet over rss chief mohan bhagwat statement about divorce