फिल्मफेअरमध्ये असं काय घडलं की गीतकार म्हणाला, 'अलविदा अॅवॉर्ड्स'

Lyricist Manoj Muntashir boycotts all awards
Lyricist Manoj Muntashir boycotts all awards

गुवाहाटी : चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे 'फिल्मफेअर अॅवॉर्डस'! १५ फेब्रुवारीला हा फिल्मफेअरचा हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. आलिया भट, रणवीर सिंग, आयुषमान खुराना, करण जोहर व इतर अनेकांच्या उपस्थितीत हा झगमगीत सोहळा पार पडला. ६५व्या फिल्मफेअर अॅवॉर्ड्समध्ये 'गली बॉय'ने आपली छाप उमटवली. पण, या सोहळ्यावर एक गीतकार अत्यंत नाराज आहे. कोण आहेत हे गीतकार? 

'फिल्मफेअर अॅवॉर्डस् २०२०' मध्ये गली बॉयने जादू केली आहे. रणवीर आणि आलियाला सर्वोकृष्ट अभिनेता व अभिनेत्री पुरस्कार मिळाला, तर अपना टाईम आयेगा या गाण्याला सर्वोकृष्ट गीताचा पुरस्कार मिळाला आहे. डिव्हाईन व अंकित तिवारी यांना हा पुरस्कार मिळाला. याच निर्णयावर नाराज होत, केसरी चित्रपटातील 'तेरी मिट्टी' गाण्याचे गीतकार मनोज मुंतशीर नाराज झाले आहेत. अक्षय कुमारच्या केसरी या चित्रपटातील तेरी मिट्टी हे गाणं सर्वांनाच भावलं होते. या गाण्याला फिल्मफेअरचे नामांकन मिळाले होते. पण त्यांना अॅवॉर्ड न मिळाल्याने मनोज नाराज झाले आहेत. पुढील गोष्ट म्हणजे त्यांनी यापुढे होणाऱ्या सर्वच पुरस्कारांवर बहिष्कार टाकला आहे. 

मनोज यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, 'प्रिय पुरस्कार, मी माझ्या आयुष्यात कितीही प्रयत्न केले तरी मेरी मिट्टी सारखे गीत लिहू शकत नाही. तू कहती थी तेरा चंदा हूं मै और चंदा हमेशा रहता है - या ओळीने लाखो भारतीय आपल्या मातृभूमीसाठी भावनिक झाले. अशा गाण्याला डावलून तू माझ्या कलेचा अपमान केला आहे. मला तुझा विचार करून गाणी लिहायची नाहीत. पण आता मीच तुला अलविदा करतोय. मी अधिकृतपणे सांगतो की आता शेवटच्या श्वासापर्यंत कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला मी जाणार नाही. ' अशा शब्दांत मनोज यांनी आपल्या मनातील भावना व राग व्यक्त केला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Alvida Awards..!!!

A post shared by Manoj Muntashir (@manojmuntashir) on

६५व्या फिल्मफेअर अॅवॉर्ड्समधील नाराजी नाट्यामुळे ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. यापूर्वीही अनेक कलाकारांनी पुरस्कारांवर बहिष्कार टाकला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com