अभिनेत्री विजयाशांती भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेश आज शक्य

आर. एच. विद्या
Monday, 7 December 2020

बृहन् हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीतील भाजपने मारलेली मुसंडी पाहून तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे. हे सर्व नेते भाजपकडे डोळे लावून बसले आहेत. काँग्रेसमधून नुकताच राजीनामा दिलेल्या आणि ‘लेडी अमिताभ’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री विजयाशांती आज (ता. ७) भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

हैदराबाद - बृहन् हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीतील भाजपने मारलेली मुसंडी पाहून तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) आणि काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे. हे सर्व नेते भाजपकडे डोळे लावून बसले आहेत. काँग्रेसमधून नुकताच राजीनामा दिलेल्या आणि ‘लेडी अमिताभ’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री विजयाशांती आज (ता. ७) भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘टीआरएस’च्या कारभाराबाबत जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेला असंतोष आणि निवडणुकीत काँग्रेसचे झालेले पानिपत यामुळे या दोन्ही पक्षांमधील असंतुष्ट नेते भाजपमध्ये राजकीय भविष्य आजमावण्याचा विचार करत आहेत. 

अयोध्येत २८ वर्षांनी ६ डिसेंबर शांततेत

यासाठी ते भाजप नेत्यांशी संपर्क साधण्याचा, पक्ष प्रवेशासाठी कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्या विजयाशांती या भाजपमध्येच जाणार असल्याची अटकळ बांधली जात होती. हा अंदाज आजच खरा ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या राज्यातील आणखी एका बड्या नेत्याला भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न पक्षाचे एक सरचिटणीस करत आहेत. 

काँग्रेसबरोबर सत्ताधारी ‘टीआरएस’लाही खिंडार पडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Vijayashanti BJP entry possible today Politics