रेल्वे सणासुदीसाठी १९६ गाड्या सोडणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 15 October 2020

रेल्वेतर्फे देशातील विविध मार्गांवर या काळात २०० विशेष प्रवासी गाड्या सोडण्याचे नियोजन असल्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी नुकतेच सांगितले होते.

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेतर्फे सणासुदीच्या दिवसांसाठी देशातील विविध राज्यांतून १९६ मार्गांवर ३९२ अतिरिक्त प्रवासी गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यातील ३९ मार्गांची यादी जारी करण्यात आली. यात हरिद्वार एक्‍प्रेस व निजामुद्दीन-मुंबई सेंट्रल राजधानी एक्स्प्रेससह महाराष्ट्रातून सुटणाऱ्या किंवा राज्यात येणाऱ्या किमान ११ गाड्यांचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेल्वेतर्फे २० ऑक्‍टोबर ते ३० नोव्हेंबर या काळात या अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्यात येतील. रेल्वेतर्फे देशातील विविध मार्गांवर या काळात २०० विशेष प्रवासी गाड्या सोडण्याचे नियोजन असल्याचे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी नुकतेच सांगितले होते. त्यातील काही गाड्यांची घोषणा काल करण्यात आली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातून सुटणाऱ्या विशेष गाड्या 
मुंबई सेंट्रल-निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी (दररोज) 
लोकमान्य टिळक टर्मिनस ते नाशिक-दिल्ली-हरिद्वार एसी एक्स्प्रेस (आठवड्यातून दोनदा-सोमवार-गुरुवार) 
लोकमान्य टिळक टर्मिनस- लखनौ एसी एक्‍प्रेस - (साप्ताहिक) 
अजनी- पुणे (साप्ताहिक) 
निजामुद्दीन-पुणे एसी एक्स्प्रेस(आठवड्यातून दोनदा) 
निजामुद्दीन पुणे दुरांतो एक्स्प्रेस (आठवड्यातून दोनदा) 
हावडा- पुणे दुरांतो (आठवड्यातून दोनदा) 
नागपूर-अमृतसर (साप्ताहिक) 
कामाख्या- लोकमान्य टिळक टर्मिनस -एसी एक्स्प्रेस (साप्ताहिक) 
वांद्रा टर्मिनस-निजामुद्दीन युवा एक्स्प्रेस(साप्ताहिक) 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चेअर कार एसी एक्‍प्रेस 
-मुंबई सेंट्रल - अहमदाबाद शताब्दी (रविवार सोडून दररोज) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Additional special trains for festival days by Indian Railways