Modi Video : संतांकडून पंतप्रधान मोदींनी स्वीकारलं 'सेंगोल', तमिळ परंपरेनुसार होणार स्थापना

pm narendra modi
pm narendra modiesakal

New Parliament Images : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संतांच्या हस्ते बहुचर्चित सेंगोल स्वीकारलं. हे सेंगोल उद्या नवीन संसद भवनामध्ये स्थापित करण्यात येणार आहे. तमिळ परंपरेनुसार हा स्थापना समारोह होणार आहे.

१९४७मध्ये सत्तेच्या हस्तांतरणाचं प्रतिक म्हणून हे सेंगोल तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेलं होतं. तो एक राजदंड आहे. अलाहाबादच्या संग्रहालयात हे सेंगोल ठेवण्यात आलेलं होतं. ५ फूट लांब आणि ८०० ग्राम वजन असलेलं सेंगोल न्यायाचं प्रतिक मानलं जातं. तमिळमध्ये सेंगोलला समृद्धी आणि संपन्नतेचं प्रतिक समजलं जातं.

pm narendra modi
Niti Aayog Meeting : निती आयोगाच्या बैठकीत काय घडलं?, नरेंद्र मोदी काय म्हणाले?

उद्या संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होत आहे. विरोधकांनी या उद्घाटनावर बहिष्कार टाकलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी राष्ट्रपतींच्या हस्ते संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करावं, अशी विरोधकांची मागणी होती. परंतु केंद्र सरकारने या मागणीची दखल घेतली नाही.

थम्बीरन स्वामी यांनी लॉर्ड माऊंटबॅटन यांना हे सेंगोल दिलं होतं. त्यांनी ते पुन्हा थम्बीरन स्वामी यांना भेट दिलं. त्यानंतर पारंपारिक संगीत आणि शोत्रायात्रा काढून हे सेंगोल पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं. थम्बरीन स्वामी यांनी सत्ता हस्तांतरणाचं प्रतिक म्हणून सेंगोल नेहरुंना भेट दिलं होतं.

pm narendra modi
Sharad Pawar : इमारत बांधताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही; शरद पवारांची दुसरीच नाराजी

कुठे सापडलं सेंगोल?

पंडित जवाहरलाल नेहरु यांची चालण्याची काठी अशी ओळख असलेली काठी मुळात एक सेंगोल असल्याचं समोर येत आहे. सेंगोल म्हणजं साम्राज्याचं आणि सामर्थ्याचं प्रतिक. चेन्नईतील वुमुडी बंगारु ज्वेलर्स अर्थात VBJ यांनी याबद्दल माहिती दिली आहे. व्हीबीजेचे व्यवस्थापकीय संचालक अमरेंद्रन म्हणाले की, २०१८ मध्ये आम्ही एका मासिकमध्ये सेंगोलबद्दल वाचलं होतं. त्यापूर्वी आम्हांला याबद्दल काहीही माहिती नव्हती. २०१९ मध्ये संग्रहालयात याबद्दल सर्व माहिती मिळाली. अहलाबाद संग्रहालयामध्ये ही सेंगोल होती. याचा एक व्हीडिओ आम्ही बनवला आणि पंतप्रधानांकडे पाठवला, असं अमरेंद्रन यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com