Aaditya Thackeray : काँग्रेसच्या ‘त्या’ आमदाराला निलंबित करा, बेळगाव प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांची मागणी
Maharashtra Politics : आदित्य ठाकरे यांनी कर्नाटक काँग्रेस आमदाराच्या मुंबई केंद्रशासित प्रदेश विधानावर आक्षेप घेत निलंबनाची मागणी केली. शिवसेना (उद्धव) पक्षाने वादावर आक्रमक भूमिका घेतली.
मुंबई : मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची भाषा करणाऱ्या कर्नाटकमधील काँग्रेसच्या आमदाराला निलंबित करा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.