Viral Wedding Card वकिलाच्या लग्नपत्रिकेत मॅरेज अ‍ॅक्ट अन् संविधानाची कलमं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Wedding Card वकिलाच्या लग्नपत्रिकेत मॅरेज अ‍ॅक्ट अन् संविधानाची कलमं

Viral Wedding Card वकिलाच्या लग्नपत्रिकेत मॅरेज अ‍ॅक्ट अन् संविधानाची कलमं

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

गुवाहटी : आपल्या लग्नाची पत्रिका इतरांच्या तुलनेत वेगळी आणि चर्चेचा विषय असवी असे प्रत्येकालाच वाटत असते. नुकतीच एका व्यक्तीनं आपला राजकीय विरोध दाखवण्यासाठी आपल्या मुलीच्या विवाह समारंभापासून भाजप-जेजेपी-आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी दूर रहावं, असा उल्लेख असल्याची लग्नपत्रिका सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झाली होती. या पत्रिकेची चर्चा थांबते न थांबते तोच आसाम येथील एका वकिलाने (Lawyer wedding card viral) त्याच्या लग्नाच्या पत्रिकेत संविधान थीम असलेली लग्नपत्रिका छापली आहे. ही पत्रिकादेखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

हेही वाचा: "भाजप-जेजेपी-आरएसएसच्या लोकांनी लग्नाला येऊ नये"; लग्नपत्रिका व्हायरल

या सर्वानंतर संविधानावर आधारित असलेली ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. काहींनी लग्नाचे आमंत्रण वाचून CLAT अभ्यासक्रमाचा अर्धा भाग पूर्ण केल्याचे गमतीने म्हंटले आहे. तर काही सोशल मीडियाच्या युजरने, "पंडितांच्या जागी न्यायाधीश बसवण्याचेदेखील सूचविले आहे."

सोशल मीडियावर अलीकडेच, अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव यांची छायाचित्रे असलेली समाजवादी पार्टीच्या रंगात छापलेली यूपीतील लग्नपत्रिका आणि मदुराईतील एका जोडप्याच्या लग्नपत्रिकेवर QR कोड असलेली लग्नपत्रिका व्हायरल झाली होती. त्यानंतर आता संविधानावर आधारित असलेली वकीलाच्या लग्न पत्रिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

loading image
go to top